जे लोक कमी हसतात त्यांच्यामध्ये लठ्ठपणाचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळे हसत राहा.
हास्याचा संबंध हृदयाशीही पाहिला आहे. जे लोक हसतात ते आनंदी असतात. त्यांना हृदयविकाराचा धोका खूप कमी असतो.
हसण्याने एंडोर्फिन नावाचा हार्मोन जागृत राहतो. यामुळे शरीरातील ताणतणाव दूर होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते.
हसण्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तुमच्या शरिरातील इम्यून सिस्टम वाढवण्यासाठी हसणं गरजेचं आहे.
तुमची सुखाची झोप हवी असेल तर हसणं गरजेचं आहे. शरिरात मेलाटोनिन हार्मोन निर्माण होत असल्याने तुम्हाला सुखाची झोप लागते.
हसण्यामुळे केवळ शारिरीक क्षमता वाढवणाऱ्या पेशी वाढतात. हसण्याने रक्त प्रवाह वाढतो आणि स्नायू मजबूत होतात.
संपूर्ण जगभरात World Laughter Day साजरा केला जातोय. हसणं म्हणजे निरोगी आरोग्याचं टॉनिक. जाणून घ्या काय काय फायदे होतात.
हसा लेको हसा, खदाखदा हसा..