Share Market मध्ये महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेश सरस! थक्क करणारे आकडे पाहाच

इतक्या नव्या गुंतवणूकदारांची शेअर बाजारात एन्ट्री

2023 मध्ये शेअर बाजारामध्ये तब्बल 1.57 कोटी नव्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे.

पहिल्यांदाच गुंतवणूक करणारे किती?

कोणत्या राज्यातील किती जणांनी 2013 मध्ये शेअर बाजारात पहिल्यांदाच गुंतवणूक केली आहे हे पाहूयात...

सहाव्या स्थानी पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमधील 47.75 लाख लोकांची शेअर बाजारात गुंतवणूक आहे. यापैकी 9.71 लाख गुंतवणूकदार पहिल्यांदाच गुंतवणूक करणारे आहेत.

तामिळनाडू पाचव्या स्थानी

शेअर बाजारात गुंतवणुकीत तामिळनाडूचे 47.43 लाख लोक शेअर बाजारात असून त्यापैकी पहिल्यांदाच गुंतवणूक करणारे 8.18 लाख लोक आहेत.

चौथ्या स्थानीही दाक्षिणात्य राज्य

कर्नाटक सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. या राज्यातील 47.72 लाख गुंतवणूकदार शेअर बाजारात आहेत.

कर्नाटकमध्ये किती नवगुंतवणूकदार?

यावर्षी कर्नाटकमधील 7.44 लाख लोकांनी पहिल्यांदा गुंतवणूक केलीय.

गुजरात तिसऱ्या स्थानी

गुजराती लोक शेअर बाजारात असतात असं म्हणतात. मात्र शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या राज्यांच्या यादीत गुजरात तिसऱ्या स्थानी आहे.

शेअर बाजारात किती गुजराती?

एकूण 77.68 लाख गुजरात्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केलीय.

पहिल्यांदा नोंद केलेले गुजरातील किती?

2023 मध्ये गुजरातमधील 11.30 नव्या गुंतवणूकदारांनी पहिल्यांदा नोंद केली. ही वाढ 17.2 टक्के आहे.

उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी

शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या यादीत उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी आहे. या राज्यात शेअर्समध्ये गुंकवणूक करणारे 89.47 लाख इतके आहेत.

सर्वाधिक नवगुंतवणूकदार

उत्तर प्रदेशमध्ये यंदाच्या वर्षी सर्वाधिक नवगुंतवणूकदार म्हणजेच पहिल्यांदा शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे लोक आहेत.

उत्तर प्रदेशमधून पहिल्यांदाच...

यंदा उत्तर प्रदेशमधून 23 लाख 12 हजार जणांनी पहिल्यांदाच शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवलं आहे.

उत्तर प्रदेशने महाराष्ट्रालाही मागे टाकलं

2023 मधील नवगुंतवणूकदार म्हणजे पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येमध्ये उत्तर प्रदेशने महाराष्ट्रालाही मागे टाकलं आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूकदार

महाराष्ट्रामधील नवीन गुंतवणूकदारांची संख्या 21.80 लाख इतकी आहे. महाराष्ट्रातील एकूण गुंतवणूकदार हे 1 कोटी 48 लाखांहून अधिक आहे.

त्तर प्रदेशची कामगिरी अश्चर्यचकित करणारी

राज्यनिहाय आकडेवारी एनएसई लिमिटेडने जारी केलेली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशची कामगिरी खरोखरच अश्चर्यचकित करणारी आहे.

VIEW ALL

Read Next Story