पथिराना 17 वर्षांचा असताना स्कूल क्रिकेटमध्ये गोलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याचवेळी धोनीची नजर पथिरानावर पडली
चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने पथिरानावर विश्वास दाखवत त्याला डेथ ओव्हर्सची जबाबदारी दिली त्याने ती सार्थ ठरवली
आयपीएलच्या या हंगामात पथिरानाने डेथ ओव्हर्समधअये 7.86 च्या इकोनॉमी रेटने 12 विकेट घेतल्या आहेत.
गोलंदाजीच्या अॅक्शनमुळे पथिरानाला 'बेबी मलिंगा' आणि 'न्यू मलिंगा' असं म्हटलं जातं.
यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईसाठी श्रीलंकेचा वेगवान गोंलदाज मथीशा पथिराना हुकम्मी एक्का ठरतोय.
धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईने 12 सामन्यात 7 विजय मिळवत 15 पॉईंट जमवलेत.
चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या पॉईंटटेबलमध्ये थेट दुसऱ्या क्रमांकवर झेप घेतली आहे.