आयपीएल अंतिम टप्प्यात

क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाणार इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलआता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

गुजरात-चेन्नई अंतिम सामना

हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स आणि महेंद्रसिंग धोणीची चेन्नई सुपर किंग्स फायनलमध्ये पोहचेली आहे. अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर अंतिम सामन्याचा भव्या सोहळा रंगणार आहे.

जगातील सर्वात महागडी क्रिकेट लीग

इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात महागडी आणि श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होतात. ऑक्शनमध्येही खेळाडूंवर करोडोची बोली लावली जाते.

बक्षीसात भरसाठ वाढ

2008 पासून सुरु झालेल्या आयपीएएल स्पर्धेचा हा सोळावा हंगाम आहे. जसजशी स्पर्धेची वर्ष वाढत गेली, तसतशी या स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेतही भरघोस वाढ होत गोली.

इतर लीगपेक्षा महागडी स्पर्धा

आयपीएलच्या धर्तीवर जगभरात अनेक क्रिकेट लीग खेळवल्या जातात. यात बिग बॅश लीग , पाकिस्तान सुपर लीग , कॅरेबिअन प्रीमिअर लीग अशा अनेक लीग होतात. या स्पर्धांमध्ये आणि आयपीएल स्पर्धेच्या बक्षीस रकमेत जमीन आसमानाचा फरक आहे.

आयपीएल प्राइज मनी

आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजे 2008 मध्ये बक्षीसाची एकूण रक्कम 12 कोटी रुपये इतकी होती. विजेत्या संघाला 4.8 (Winner) तर उपविजेत्या संघाला (Runners-up) 2.4 कोटी रुपये मिळाले होते.

तिसऱ्या-चौथ्या संघालाही बक्षीस

तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरच्या संघाला प्रत्येकी 1.2 कोटी रुपये देण्यात आले होते. तर आयपीएल 2008 च्या विजेत्या अर्थात राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 1.2 कोटी बक्षिस देण्यात आलं होतं.

बक्षीसाच्या रकमेत दहापट वाढ

आता आयपीएलचा सोळाव्या हंगामात बक्षीसांची रक्कम दहापट वाढ झाली आहे. यंदा बक्षीसाची एकूण रक्कम 46.5 कोटी रुपये इतकी आहे. विजेत्या संघाला तब्बल 20 कोटी रुपये मिळणार आहेत.

उपविजेता संघही मालामाल

उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये दिले जाणार आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरच्या संघाला अनुक्रमे 7 आणि 6.5 कोटी रुपये मिळतील.

ऑरेंज-पर्पल कॅप विजेत्यांना लॉटरी

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप (Orange Cap) पटकावणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅप (Purple Cap) पटकावणाऱ्या खेळाडूला प्रत्येकी 15 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे.

इतर विजेत्यांनाही बक्षीस

याशिवाय इमर्जिंग प्लेअरला 20 लाख रुपये, सुपर स्ट्रायकर ऑफ सीजन 15 लाख रुपये, पॉवर प्लेअर ऑफ द सीजन, मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर ऑफ द सीजन या खेळाडूं प्रत्येकी 12 लाखांचं बक्षीस मिळेल

सर्धाधिक सिक्ससाठी पैसे

गेमचेंजर प्लेयर ऑफ द सीजन आणि सर्वात जास्त सिक्स मारणाऱ्या खेळाडूंनाही प्रत्येकी 12 लाख रुपये बक्षीसांची रक्कम असणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story