याशिवाय अंपायर्सना बीसीसीआयकडून स्पॉन्सरशिपचा लाभही मिळतो. स्पॉन्सरशिपमधून अंपायर्सना संपूर्ण हंगामाचे 7.33 लाख रुपये मिळतात.
दुसरी श्रेणी डेव्हलपमेंट श्रेणी असं म्हटलं जातं. या श्रेणीतील अंपायर्सना आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यासाठी 59 हजार रुपयांचं मानधन मिळतं.
एक अंपायर्स आयपीएलमध्ये जवळपास 20 सामन्यात अंपायरिंग करतो. म्हणजे संपूर्ण आयपीएलमध्ये तो जवळपास 40 लाख रुपये कमावतो
आयसीसी एलीट पॅनलमध्ये असलेल्या अपंयार्सना आयपीएलमधल्या प्रत्येक सामन्यात अंपायरिंग करण्यासाठी दोन लाख रुपये रुपये मिळतात.
पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, खेळाडूच नाही तर आयपीएलमुळे अंपायर्सही मालामाल होतात. अंपायर्सची दोन श्रेणीत विभागणी होते.
आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावली जाते. अगदी स्थानिक क्रिकेट खेळणारे क्रिकेटपटूही लखपती होतात.
आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला 31 तारखेपासून सुरुवात झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भव्य उद्घाटन सोहळ्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली.