जखमी झाल्यानंतर स्टॉइनिस मैदानाबाहेर गेला. स्टॉईनिस पुढच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्याप संघ व्यवस्थापनाने भूमिका स्पष्ट केलेली नाही.
सामन्यात गोलंदाजी करत असताना स्टॉइनिसच्या बोटाला दुखापत झाली. पंजाबच्या अथर्व तायडेने मारलेला एक जोरदार फटका अडवताना स्टॉयनिस जखमी झाला.
पण सामना जिंकल्यानंतर लखनऊ संघासाठी एक वाईट बातमी आहे. या सामन्यात स्टॉईनिस जखमी झाला.
या सामन्यात स्टॉईनिसने 40 चेंडूत 72 धावा फटकावल्या. यात 5 सिक्स आणि 6 चौकारांचा समावेश होता.
लखनऊच्या विजयाचा खरा हिरो ठरला तो ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोईनिस. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही त्यानेच पटकावला.
या सामन्यात लखनऊने इतिहास रचला. लखनऊने तब्बल 255 धावा केल्या. आयपीएलमधली ही दुसरी सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे.
लखनऊने शुक्रवारी पंजाब किंग्सविरुद्धचा सामना तब्बल 56 धावांनी जिंकत पॉईंटटेबलमध्ये थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.