धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तब्बल चार वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. शिवाय आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यात धोनीने कर्णधारपद भूषवलं आहे.
त्यामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये पुन्हा आनंदाचं वातावरण आहे. धोनी आयपीएलचा आणखी एक हंगाम खेळू शकतो.
आयपीएलमधून निवृत्ती घेणार का याबाबत कोणतेही संकेत धोनीने दिलेले नाहीत. त्यामुळे संघात अशी कोणतीही चर्चा नाही असं फ्लेमिंगने म्हटलंय.
पण चेन्नई सुपर किंग्सचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने धोनीच्या निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलं आहे.
धोनी येत्या सात जुलैला 42 वर्षांचा होईल. वाढत्या वयामुळे धोनी आयपीएलमधून निवृत्त होण्याची चर्चा सुरु झाली आहे.
सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीचीही शेवटची आयपीएल स्पर्धा असल्याचं बोललं जात आहे. यानंतर धोनी निवृत्त होण्याची शक्यता आहे.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे आतापर्यंत 9 सामने झाले असून पाच सामने जिंकत सीएसके पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.