युझवेंद्र चहलच्या आक्रमक गोलंदाजीपुढं विरोधी संघातील फलंदाज टिकणार का, हा प्रश्नच राहिला.
वेगवान गोलंदाज के.एम.आसिफची गोलंदाजी या सामन्यात यशस्वी ठरते का, याकडेही कर्णधार लक्ष ठेवून असेल.
संघाला गरज असतानाच ट्रेंट बोल्टचं येणं आणि छाप सोडणारी कामगिरी करणं या सामन्यातही पाहायला मिळेल अशीच क्रिकेटप्रेमींची अपेक्षा.
रविचंद्रन अश्विन म्हणजे संघातील हुकमी एक्का. त्याच्या फिरकीपुढे कोण गारद होतं हे पाहणं महत्त्वाचं.
अप्रतिम Fielding साठी ओळखल्या जाणाऱ्या जेसन होल्डरकडून आज कोणत्या खेळाचं प्रदर्शन होतं हे पाहणंही औत्सुक्याचं.
रियान पराग संघात कोणत्या स्थानावर खेळण्यासाठी येईल हा प्रश्न सध्या अनेकांनाच पडत आहे.
शिमरॉन हेटमायरची खेळी पाहणंही क्रिकेटप्रेमींसाठी परवणी असेल. त्याला फक्त योग्य सूर गवसण्याची गरज
सध्या तरुणींमध्ये चर्चेत असणाऱ्या देवदत्त पडिक्कलच्या खेळाकडेही अनेकांच्याच नजरा असतील.
संजू सॅमसनच्या फलंदाजीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं असेल.
जोस बटलरची आक्रमक फलंदाजी पाहताना यावेळी गोलंदाजांच्या नाकीनऊ येऊ शकतात.
मागील सामन्याप्रमाणं यशस्वी जयस्वाल या सामन्यातही वेगवान अर्धशतकी खेळी करण्यात यशस्वी राहतो का हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
IPL 2023 : राजस्थानच्या संघात आज कोणाचं नाणं खणखणीत? पाहा संभाव्य Playing 11