प्रेरणादायी प्रवास

मात्र यशस्वीचा आतापर्यंतचा प्रवास हा खरोखरच थक्क करणारा असून त्याच्याकडून नक्कीच अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

संघात स्थान देण्याची मागणी

आता यशस्वीला भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघामध्ये स्थान देण्याची मागणी केली जात आहे.

नंतर मागे वळून पाहिलं नाही

यानंतर यशस्वीने मागे वळून पाहिलं नाही आणि आज तो थेट IPL मधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा खेळाडू होण्यापर्यंतची मजल मारली आहे.

पूर्णपणे क्रिकेट

ज्वाला सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीने आर्थिक चिंता सोडून पूर्णपणे क्रिकेट फोकस करत खऱ्या अर्थाने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. अंडर 19 संघात त्याने चमकदार कामगिरी केली.

नशीब पालटलं

मात्र यशस्वीचं नशीब 2013 मध्ये पालटलं जेव्हा त्याचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी त्याच्यातील कौशल्य ओळखून त्याला पाठबळ देण्यास सुरुवात केली.

पाणीपुरी विकली

सन 2011 मध्ये मुंबईत आलेल्या यशस्वीला मायानगरीमध्ये टिकून राहण्यासाठी सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाहापुरते पैसे मिळावे म्हणून आझाद मैदानाबाहेर वडिलांबरोबर पाणीपुरी विक्रीचा व्यवसायही करावा लागला.

...अन् तो क्रिकेटच्या पंढरीत आला

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशस्वीने अगदी लहान वयामध्ये भारतातील क्रिकेटची पंढरी म्हणजेच मुंबईचा मार्ग धरला.

क्रिकेटपटू व्हायचं लहानपणीच ठरवलं

घऱी परिस्थिती हालाखीची असतानाही यशस्वीने क्रिकेटपटू व्हायचं असं लहानपणीच ठरवलं होतं.

हालाखीची परिस्थिती

यशस्वीच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या वडिलांचे एक दुकान होते. मात्र कुटुंबातील दोन मुले आणि पत्नीला सांभाळता येईल इतकेही त्यांचे उत्पन्न नव्हते.

प्रवास सोपा नाही

यशस्वीवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असला तरी त्याचा इथपर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता.

सर्वात वेगवान अर्धशतक

यशस्वीची ही खेळी IPL मधील सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं आहे.

अनोखा विक्रम

राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वालने कोलकात्याविरुद्ध 13 चेंडूंमध्ये 50 धावा करत अनोखा विक्रम नोंदवला.

पाणीपुरी विक्रेता ते Fastest 50

यशस्वी जयस्वालचा आतापर्यंत प्रवास थक्क करणारा आहे.

VIEW ALL

Read Next Story