शिस्त ही नकळत शिकवली जाते. पण ती मुलांवर कधीच लादू नका. मुलांना ओरडण्यापेक्षा त्यांना मारण्यापेक्षा काही गोष्टी बसवून सांगितल्या पाहिते.
मुलांमधील चांगल्या सवयी ओळखा त्यासोबतच काही सवयी ठरवून त्याला लावा. मुलाने चांगल्या केलेल्या कृतीचं कौतुक करा.
मुलांशी वागताना अनेकदा स्पष्टपणा मदत करतो. जसे की, काही स्पष्ट नियम तयार करा. तसेच मुलांना काही लक्ष्मरेषा आखून द्या. एवढंच नव्हे तर मुलांकडे काही जबाबदाऱ्या देखील द्या.
मुलांना शांत व्हायला वेळ द्या. शांत झाल्यावर त्यांच्याशी संवाद साधा. हा संवाद एका विशिष्ट जागी असला तर फायदा होईल.
पालकांनी मुलांना नकारात्मक वागणुकीवरुन पुन्हा सकारात्मक वागुणकींकडे वळवा. यामुळे त्यांना देखील त्यांच्यातील चांगली बाजू दिसेल.
पालकांनी मुलांशी संवाद साधताना अतिशय आदराने संवाद साधावा. त्यांचे प्रश्न सोडवावेत. मुलांसमोर तुम्ही आदर्श उभा करा. एक पालक म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून काही गोष्टी शिकवा.
मुलांना त्यांच्या वागणुकीचा लॉजिकल विचार करायला शिकवा. त्यांच्या कृतीतून या गोष्टी शिकवल्यामुळे नातं होईल अधिक घट्ट
मला आज असं वाटतंय... या वाक्यापासून मुलांशी संवाद साधायला सुरुवात करा. यामुळे मुलं अधिक मोकळेपणाने बोलू लागतील.
मुलांना एखाद्या प्रश्नावरच उत्तर शोधायला लावा. यामुळे मुलांच्या संकल्पना आणि विचारक्षमता अधिक खुलेल.
पालकांनी मुलांना सतत चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवा. जेणे करुन तुमचं नातं तर घट्ट होईल पण मुलामध्ये एक सकारात्मक विचार रुजू लागेल.
मुलांशी अतिशय सहानुभूतीने वागा. मुलांच्या दृष्टीकोनातून सगळ्या गोष्टींचा विचार करा