एलोवेरा हे आरोग्या सह त्वचा आणि केसांसाठी सुद्धा फायदेशीर मानलं जातं. एलोवेरामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. जे त्वचेवर ग्लो परत आणण्यास मदत करू शकतात.
रात्री झोपण्यापूर्वी बरेच लोक चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावतात. ते त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतं.
एलोवेराच्या जेलमध्ये व्हिटॅमिन सी, ए, ई आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. हे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं आणि सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानापासून सुद्धा चेहऱ्याचं संरक्षण करतं.
जर दररोज रात्रभर चेहऱ्यावर एलोवेराचे जेल लावले तर पिंपल्सची समस्या कमी होण्यास मदत होते. कापसाच्या मदतीने तुम्ही जेल थेट मुरुम असलेल्या भागावर लावू शकता.
एलोवेराचे जेल रात्री काही काळ चेहऱ्यावर लावले तर ते काळे डाग कमी करण्यासउपयुक्त ठरू शकतात.
एलोवेरा तेलकट आणि कोरड्या दोन्ही प्रकारच्या त्वचेसाठी चांगलं ठरतं. एलोवेरामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असतं, जे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकतं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)