चांदीच्या वस्तू घालणं ही फक्त एक फॅशन नसून त्याच्यामागे अनेक वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारणं सुद्धा आहेत.
चांदीच्या वस्तू घातल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चांदीमध्ये नैसर्गिक अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात त्यामुळे तो एक अतिशय उपयुक्त धातू मानला जातो.
चांदी परिधान केल्याने शरीराचे तापमान योग्य जाते. चांदीमध्ये उपस्थित नैसर्गिक शीत गुणधर्म शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यास मदत करतात.
चांदी परिधान केल्याने तणाव दूर राहतो. जास्त ताणतणाव घेत असाल तर चांदीच्या ब्रेसलेट किंवा अंगठी घालून तुम्हाला आराम मिळू शकेल.
चांदीच्या वस्तू परिधान केल्यास त्वचेवरील ऍलर्जी आणि इंफेक्शन निघून जाण्यास मदत होते.
ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या रुग्णांनी चांदीच्या वस्तू परिधान केल्यास ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब सामान्य ठेवला जाऊ शकतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही.अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)