पुरुषांमध्ये दिसतात डायबेटिजची 5 लक्षण, अजिबात दुर्लक्ष करू नका

Published by: Pooja Pawar | Aug 03, 2025

डायबेटिज ही जगभरातील एक वाढती समस्या आहे. केवळ प्रौढचं नाही तर लहान मुलं सुद्धा आजकाल डायबेटीजच्या विळख्यात येऊ लागली आहेत.

Published by: Pooja Pawar | Aug 03, 2025

डायबेटीज झाल्यावर किंवा सुरुवात होत असताना शरीरात काही लक्षण जाणवतात. पुरुषांमध्ये डायबेटिजची काही लक्षणे महिलांपेक्षा वेगळी असू शकतात.

Published by: Pooja Pawar | Aug 03, 2025

तेव्हा पुरुषांमध्ये दिसतात डायबेटिजची कोणती लक्षणं दिसतात याविषयी जाणून घेऊयात.

Published by: Pooja Pawar | Aug 03, 2025

सारखी लघवीला होणं :

डायबेटिजचं एक सामान्य लक्षण म्हणजे वारंवार लघवीला होणं. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा मूत्रपिंड अतिरिक्त ग्लुकोज लघवीद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं. बऱ्याचदा रात्री सुद्धा अनेकवेळा लघवीला होतं, परिणामी झोपेत अडथळा येऊ शकतो.

Published by: Pooja Pawar | Aug 03, 2025

तहान लागणे :

वारंवार लघवीला झाल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासते. ज्यामुळे व्यक्तीला सारखी तहान लागू शकते. हे सुद्धा डायबेटिजचं लक्षण आहे. पाणी पिऊन सुद्धा तहान भागत नसेल तर हे हाय ब्लड शुगरचं संकेत आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 03, 2025

अतिरिक्त थकवा :

डायबेटिजच्या रुग्णांना नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. कारण शरीर ग्लुकोजचे उर्जेमध्ये योग्यरित्या रूपांतर करू शकत नाही. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे किंवा प्रतिकारामुळे, पेशींना आवश्यक प्रमाणात ऊर्जा मिळू शकत नाही त्यामुळे थकवा जास्त जाणवतो.

Published by: Pooja Pawar | Aug 03, 2025

वजन अचानक वाढणे किंवा कमी होणं :

वजन अचानक वाढणं किंवा कमी होणं हे डायबेटिजचं लक्षण आहे. टाइप-1 डायबेटिजमध्ये शरीर ग्लूकोजचा वापर करू शकत नाही. ज्यामुळे मसल्स आणि फॅट्स वेगाने कमी होऊ लागतात. टाइप २ डायबेटिजमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्समुळे वजन वाढू शकते.

Published by: Pooja Pawar | Aug 03, 2025

इरेक्टाइल डिसफंक्शन :

पुरुषांमध्ये मधुमेहाचे एक गंभीर लक्षण म्हणजे इरेक्टाइल डिसफंक्शन. उच्च रक्तातील साखरेमुळे नसा आणि रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचते. ज्यामुळे पुरुषांमध्ये लैंगिक समस्या उद्भवू शकतात.

Published by: Pooja Pawar | Aug 03, 2025

VIEW ALL

Read Next Story