लहान मुले अनेक वेळा भाज्या खायला टाळाटाळ करतात. अशा वेळी तुम्ही विविध भाज्यांचे पराठे तयार करून त्यांच्या डब्यात देऊ शकता.
हे पराठे केवळ चविष्टच नसून, पोषणमूल्यांनी परिपूर्ण असल्याने आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतात.
बटाट्याचा पराठा पटकन तयार होतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. डब्यासाठी हा एक परफेक्ट पर्याय आहे.
गाजर हे अनेक लहान मुलांना आवडते. त्याचा पराठाही लहान मुलांना नक्कीच आवडेल आणि तो पोषकही असतो.
बीट रक्त शुद्ध करण्यास मदत करतो. बीटाचा पराठा चविष्ट आणि आरोग्यदायी असतो.
थंडीच्या दिवसांत फ्लॉवर पराठा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तो सहज तयार होतो आणि लहान मुलांनाही आवडतो.
या पराठ्यामध्ये विविध भाज्यांचा समावेश असतो. त्यामुळे तो पोषणमूल्यांनी भरलेला असतो. लहान मुलांना तो चवीलाही खूप आवडतो.
मटार पराठा खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. तो मुलांच्या टिफिनसाठी एक उत्तम पर्याय आहे.
मेथीचा पराठा आरोग्यासाठी खूप लाभदायक असतो. हा पराठा खायला देखील चविष्ट असतो.