जगातील 'या' 7 ठिकाणांवर माणसांना आहे नो एंट्री!

Pooja Pawar
Mar 27,2025


संपूर्ण पृथ्वी ही विविध प्रकारच्या नैसर्गिक सौंदर्याने नटली आहे. पृथ्वीवरील विविध ठिकाणं पाहण्यासाठी पर्यटक दरवर्षी यांना भेट देत असतात. पण जगात काही अशी ठिकाण आहेत जिथे माणसांना जाण्यास प्रतिबंध केला जातो. तेव्हा अशा ठिकाणांविषयी जाणून घेऊयात.

सीड वॉल्ट :

स्वालबार्ड ग्लोबल सीड वॉल्टमध्ये सामान्य माणसांना जाण्याची परवानगी नाही. हे एक सुरक्षित स्थान असून इथे जगभरातील विविध अन्न पिकांच्या बिया भविष्यासाठी सुरक्षित ठेवल्या जातात.

लासकॉक्स गुफा फ्रांस :

लासकॉक्स गुफा फ्रांसच्या दक्षिण पश्चिम क्षेत्रात असून ही प्राचीन पाषाणकालीन गुफा आहे. ही गुफा येथील साधारण गुफा चित्रांसाठी प्रसिद्ध असून इथे माणसांना जाण्यास बंदी आहे.

वॅटिकन सीक्रेट आर्काइव :

वॅटिकन सीक्रेट आर्काइव येथे कॅथलिक चर्च आणि याच्या इतिहासासंदर्भात अनेक कागदपत्र आणि दस्तऐवजांचा एक विशाल संग्रह आहे. हे वेटिकन सिटी,मध्ये असून इथे सुद्धा सामान्य माणसांना जाण्यास मनाई आहे.

नॉर्थ सेंटिनल आयलँड :

भारताच्या अंदमान आणि निकोबार द्वीप समूहातील नॉर्थ सेंटिनल आयलँडवर बाहेरच्या लोकांना जाण्यास सक्त मनाई आहे. इथे राहणारे सेंटिनली जनजातिचे लोक खूपच खतरनाक असून ते जगाच्या संपर्कात येण्यास घाबरतात.

वर्ल्ड ऑफ कोका-कोला म्यूजियम :

वर्ल्ड ऑफ कोका-कोला म्यूजियम हे अटलांटा येथे असून इथे कोका-कोलाचा सिक्रेट फॉर्म्युला एका हायटेक वॉल्टमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे. इथे लोकांना जाण्यास मनाई आहे.

स्नेक आयलंड :

ब्राझीलमध्ये असलेलं स्नेक आयलंड हे जगातील सर्वात खतरनाक बेटांपैकी एक आहे. इथे हजारो विषारी साप असून यात खास करून गोल्डन लांसहेड वाइपर हा साप आढळतो. या सापांच्या रक्षणासाठी आणि माणसांच्या सुरक्षेसाठी ब्राझील सरकारने येथे सामान्य लोकांना जाण्यास बंदी घातली आहे.

एरिया 51 :

अमेरिकेतील एरिया 51 येथे जाण्यास सामान्य माणसांना मनाई आहे. एरिया 51 हे अमेरिकन सैन्याचं गुप्तचर ठिकाण असून इथे खूपच कडक सुरक्षा व्यवस्था असते.

VIEW ALL

Read Next Story