दरवर्षीप्रमाणे उद्या देखील 20 नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक बालदिन साजरा केला जाणार आहे.
या निमित्ताने तुम्ही तुमच्या मुलांना काही भेटवस्तू देऊन त्यांचं तुमच्या आयुष्यातील महत्त्व पटवून देऊ शकता.
तुमच्या मुलांच्या नावासह आणि फोटोसह कस्टमाईज केलेली स्टेशनरी, पाण्याच्या बाटल्या किंवा लंच बॉक्स.
विज्ञानाचे घरी वापरता येतील असे प्रयोग किट्स किंवा 3D कोडी असणारी खेळणी.
त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट सेट, पेंट किंवा मॉडेलिंग क्ले अशा हस्तकलेच्या वस्तू.
वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी कथापुस्तके देणे फायदेशीर ठरेल.
बोर्ड गेम किंवा बिल्डिंग बॉक्स असे शैक्षणिक खेळ जे मजेदारही असतात आणि शिकताही येते.
सायकल किंवा रोलर स्केट्स देऊ शकता यामुळे शारीरिक हालचाली आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन मिळेल.
मुलांच्या आवडत्या कार्टूनचे चित्र असलेले कपडे किंवा शाळेचे दप्तर.
त्यांच्या आवडत्या कुकीज किंवा केक एकत्र करून गिफ्ट हॅम्पर तयार करू शकता.