पालकांच्या 8 चुका मुलांना बनवतात स्वार्थी आणि असंवेदनशील

या चुका पालकांनी टाळ्या

मुलांना योग्य पद्धतीने वाढवणे हा पालकांचा मुख्य हेतू असतो. पण काही पालक विशिष्ट चुका करुन मुलांना स्वार्थी आणि असंवेदनशील बनवतात.

मुलांच्या फक्त गरजा पूर्ण करणे

अनेक पालक मुलांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट देतात. मुलांना कधी नको, नाही म्हणत नाहीत. एवढंच नव्हे तर मुलांना वस्तूंची किंमत देखील पटवून देत नाही. त्यामुळे मुलांना वाटतं की, आपल्याला आयुष्यभर असंच मिळत राहणार आहे.

नियमांचा अभाव

काही पालक मुलांना कोणताच नियम घालत नाही. मुलं काहीही आणि कधीही करतात पण पालक त्यांना एका शब्दाने बोलत नाही. यामुळे मुलांमध्ये नियमांचा अभाव असतो. मुलांच्या जीवनात कोणताच नियम नसतो. ते हवे तसे वागतात.

पालक ठाम नसणे

अनेक पालक आपल्या मतावर किंवा नियमांवर ठाम राहत नाही. यामुळे मुलं गोंधळतात आणि त्यांच्या वागण्यात सुसुत्रता नसतो. यामुळे मुलं स्वार्थी आणि असवंदेनशील बनतात. ते आपल्याला हवं तसं वागतात.

भावनांची किंमत

अनेक पालक मुलांना भावनांचं महत्त्व पटवून देत नाही. मुलांना समोरच्या व्यक्तीच्या मतांचे महत्त्व वाटत नाहीत. त्यामुळे मुलं कायम एकलकोंडी किंवा स्वार्थी होतात.

ओव्हर प्रोटेक्टिंग होणे

अनेकदा पालक मुलांबाबतीत ओव्हर प्रोटेक्टिंग होतात. त्यामुळे मुलांना कायमच आपल्या अवतीभवती सुरक्षिततेचं वातावरण असतं. त्यामुळे ही मुलं कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. अशी मुलं कालांतराने स्वार्थी आणि असंवेदनशील होतात.

भौतिक सुख

पालक मुलांना भौतिक सुखात इतके अडकवून ठेवतात की, त्यांना साध्या साध्या गोष्टी शिकवत नाही. अभ्यास, मार्क्स, टक्के यापेक्षा मुलांचं शिक्षण महत्त्वाचं आहे. पालकांनी समजून घ्यायला हवं या गोष्टींमधून मुलं फक्त स्वार्थी होतात.

जबाबदारी न देणे

अनेक पालक मुलांना लहानच समजतात. त्यामुळे ते कोणतीच जबाबदारी देत नाहीत. पालकांनी असं न करता मुलांवर छोटी छोटी जबाबदारी सोपवावी.

VIEW ALL

Read Next Story