फळांवर मीठ, चाट मसाला आणि साखर टाकून खाणं चांगलं की वाईट?

Pooja Pawar
Apr 28,2025


अनेकजणांना फळांवर मीठ, साखर, चाट मसाला टाकून खायला आवडतं. पण असं करणं आरोग्यासाठी योग्य आहे का? याबाबत जाणून घेऊयात.


मीठ, साखर, चाट मसाला असे पदार्थ फळांवर टाकून त्यांचे सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.


फळांवर मीठ आणि साखर टाकून खाल्ल्याने फळांना पाणी सुटते, त्यामुळे त्यांच्यातील पोषण कमी होतं.


मीठ आणि चाट मसाल्यामध्ये आढळणारे सोडियम आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.


फळांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो, मात्र त्यात वरून साखर टाकून खाल्ल्यास त्याच्या कॅलरीज आणि ग्लुकोजचं प्रमाण सुद्धा वाढतं. ज्याच्या सेवनाने वजन वाढू शकते.


मीठ आणि चाट मसाला फळांवर टाकून खाल्ल्याने त्यात आढळणाऱ्या सोडियममुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढतं आणि त्याचा किडनीवर सुद्धा वाईट परिणाम होतो.


त्यामुळे फळांवर मीठ, चाट मसाला आणि साखर टाकून खाऊ नये असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story