दिवसभर काम करुन घरी परतल्यानंतर थकवा आणि उष्णतेमुळे येणारा घाम दूर करण्यासाठी लोक रात्रीसुद्धा अंघोळ करणं पसंत करतात.
परंतु, रात्री अंघोळ करणं हे कितपत योग्य आहे? याबद्दल अनेकांना माहित नसते. चला रात्री अंघोळ करण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या.
खरंतर, रात्रीच्या वेळी कमी तापमानात अंघोळ केल्यावर थंडी वाजू शकते आणि यामुळे सर्दी किंवा ताप यांसारखे आजार होऊ शकतात.
रात्री उशीरा अंघोळ केल्याने स्नायू कडक होण्याची शक्यता असते आणि यामुळेच स्नायू दुखण्याची समस्या उद्भवू शकते.
रात्री अंघोळ केल्याने पचनक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो तसेच त्वचा कोरडी होण्याची शक्यता देखील वाढते.
याउलट, रात्री अंघोळ करण्याचे काही फायदेसुद्धा आहेत. रात्री अंघोळ केल्याने दिवसभरातील कामाचा थकवा दूर होऊन शरीर स्वच्छ होते.
रात्री अंघोळ केल्याने चांगली झोप लागते आणि यामुळे दिवसभरातील तणाव कमी होऊन शरीर ताजेतवाने राहण्यास मदत होते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)