कोणत्याही व्यक्तिच्या मृत्यूनंतर त्याचे अवयव दुसऱ्या रूग्णांना ट्रान्सप्लांट करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. या अवयवांना मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून काढून घेऊन एका सुरक्षित ठिकाणी (Organ Bank)मध्ये ठेवले जाते.
पण प्रत्येक अवयवाचा शरीरातून बाहेर काढण्याचा आणि ट्रान्सप्लांट करण्यासाठी वेगवेगळी वेळमर्यादा असते. चला जाणून घेऊया मृत्यूनंतर कोणता अवयव किती वेळ कार्यरत राहू शकतात?
मृत्यूनंतर फुफ्फुसे आणि हृदय 4 ते 6 तास कार्यरत राहू शकतात.
6 ते 8 तास डोळे मृत्यूनंतरही कार्यरत राहतात.
कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर आतडे 6 ते 12 तास कार्यरत असतात.
12 ते 18 तास मृत्यूनंतर यकृत कार्यरत राहू शकते.
मृत्यूनंतर स्वादुपिंड 24 तास कार्यरत राहते.
किडनी मृत्यू झाल्यानंतर 72 तास कार्यरत राहते.
आपल्या शरीरातील हाडे आणि त्वचा मृत्यू झाल्यानंतर काही तास किंवा दिवस नाही तर, 5 वर्षे शाबूत राहतात.
मृत्यूनंतर हृदय जरी काही तासांसाठी कार्यरत राहत असले तरी, हार्ट वॉल्व 10 वर्षे कार्यरत राहतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)