दररोज वापरात असलेल्या पाण्याच्या बाटल्या किती दिवसांनी बदलायला हव्यात?

Pooja Pawar
Feb 03,2026


अनेकदा लोक वर्षांनुवर्षे एकच पिण्याच्या पाण्याची बॉटल वापरतात.


ऑफिस असो वा शाळा लोकं घरून पाण्याची बॉटल घेऊन जाण पसंत करतात.


अनेक आठवडे बंद बॉटलमध्ये असलेलं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.


रिपोर्ट्सनुसार पाणी नैसर्गिकपाने खराब होत नाही मात्र ज्या भांड्यात किंवा बॉटलमध्ये ते पाणी भरलं जातं त्या पाण्याची शुद्धता बदलते.


जुन्या बॉटलच्या आतल्या भागात बॅक्टेरिया आणि व्हायरसची पैदास होते.


पाण्याच्या बाटलीला दुर्गंधी येऊ लागली किंवा त्यावर डाग पडले तर ती ताबडतोब बदलणे महत्वाचे आहे.


2 ते 3 दिवस बंद बॉटलमध्ये असलेले पाणी प्यायल्यास तुम्हाला पोटदुखी, पेटके येणे अशा समस्या उद्भवू शकतात.


तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार दर 6 ते 12 महिन्यांनी प्लास्टिकची पाण्याची बाटली बदलावी.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. याबद्दल अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story