AI ला जमणार नाहीत माणसांची ही 10 कामं!
कृत्रिम बुध्दीमत्तेच्या उत्क्रांतीनंतरसूध्दा काही व्यवसाय असे आहेत जे मानवी मेंदुचं करु शकतो. निर्मितिक्षमता, भावनिक विचार, समस्या सोडवणे आदीं गोष्टी मानवीक्षमताच करु शकतात.
मानसिक आजारांवर उपाय शोधण्यासाठी तज्ञ स्वतः लक्ष देतात, मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी भावनिक संबंध आणि विश्वास असावा लागतो. जे ए.आय नाही तर फक्त मानव करू शकतो.
भावनिक सखोलता आणि कल्पकतेच्या जोरावर कलाकार कला निर्मिती करतात, ए.आय ते करु शकत नाही. कलेला प्रभावी बनवण्यासाठी कलेत भावना ओताव्या लागतात ,स्वानुभव आणि मानवी स्पर्श असावा लागतो. मिश्रित भावना आणि स्वानुभव ए.आय साठी शक्य नाही.
विश्लेषणासाठी विचारपूर्वक कठीण निर्णय घ्यावे लागतात त्यासाठी तात्कालिक ज्ञान ,धोरणात्मक विचार असावा लागतो. ए.आय विश्लेषण करू शकते मात्र दूरदृष्टी ए.आय कडे नाही.
वैज्ञानिकांना संशोधन, विचार करण्यासाठी स्वज्ञानावर जोर द्यावा लागतो. नविन ज्ञान प्राप्त करावे लागते. ए.आय मदत करु शकते पण मोठ्या शोधांसाठी मानवी निर्णय क्षमता आणि अंतदृष्टी लागते.
वकील कायदेशीर गुंता स्वमताने आणि धोरणात्मक विचारांनी सोडवतात.कायद्याच्या नियमांचा अर्थ लावणे, पिडीतांना ज्ञाय मिळवून देणे ए.आय ला शक्य नाही.
प्रतिनिधित्तव करण्यासाठी आणि ग्राहक सुविधा देण्यासाठी संयम आणि सहानुभूती असावी लागते ए.आय नियमित चौकशींना प्रतिसाद देऊ शकते मात्र समाधानकारक उपाय माणूसच देऊ शकतो.
रुग्णावर उपचार करताना पटकन निर्णय घ्यावे लागतात ,योग्य उपचार द्यावे लागतात शरीरशास्त्राच्यानूसार अचानक निर्णय घेण्यासाठी मानवी कौशल्यच असावे लागते.
शारीरिक कसब ,धोरण आखणे , बौद्धीक लौचिकता एका खेळाडूमधे असावी लागते. खेळात मानवी जोश असावा लागतो ए.आय खेळाडूंची हुबेहुब नक्कल करु शकत नाही.
लोकांशी जोडण्याची ,संवाद साधण्याची क्षमता ,सत्य शोधण्याची ईर्ष्या ,कथन कला, ही मानवी वैशिष्ये आहेत.लोकांपर्यंत बातम्या पोहचवणे पुर्णंतः मानवी काम आहे.
शिक्षक विद्यार्थ्यींना शिकवणे, प्रोत्साहीत करणे, त्यांच्या वैयक्तिक गरजा पुरवणे ही कामे करतात. शैक्षणिक क्षेत्रात मानवी सहभाग गरजेचा असतो.विद्यार्थ्यींच्या वैयक्तिक विकासासाठी शिक्षकांशी भावनिक नाते असावे लागतात.