घरच्या घरी बनवा चटकदार आंबावडी, वर्षभर टिकेल, चवही अगदी भारीच

Mansi kshirsagar
Apr 20,2025


आंबापोळी ही सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. आज आम्ही तुम्हाला याची रेसिपी सांगणार आहोत


आंबापोळी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आंब्याचे मोठे तुकडे करा आणि 1 तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर पाण्यातून काढून ते मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या


या मिश्रणात तुम्हाला हवी तितकी साखर, चिमूटभर मीठ आणि थोडासा लिंबाचा रस मिसळा आणि १० मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्या


मिश्रण चांगले पातळसर झाले की ताटात पसरवा आणि उन्हात वाळण्यासाठी ठेवून द्या.


आंबापोळी चांगली वाळल्यानंतर म्हणजेच कडक झाल्यानंतर छोट्या छोट्या स्लाइसमध्ये कापून घ्या.


आता आंबापोळी तयार आहे. लिंबाचा रस असल्याने आंबापोळी वर्षभर टिकते आणि चवीलादेखील चांगली लागते

VIEW ALL

Read Next Story