आवळा 'या' लोकांसाठी आहे विषासमान! चुकूनही खाऊ नका, अन्यथा

Jan 09,2024


ज्या लोकांना हायपर अॅसिडिटीचा त्रास असतो त्या लोकांसाठी आवळा घातक आहे. कारण हे फळं खाल्ल्यास तुमच्या शरीरातील आम्लता वाढवतं.


तुम्हाला रक्तासंबंधात काही आजार असल्यास आवळा तुमच्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आवळ्याचं सेवन करु नये.


जर तुमची कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया असेल तर साधारण 2 आठवडे आदी आवळा खाणं बंद केलं पाहिजे. जर तुम्ही आवळ्याचं सेवन केल्यास रक्तवाहिन्या फुटण्याची भीती असते.


ज्या लोकांच्या शरीरात रक्तातील साखरेची पातळी नेहमीच कमी असते अशा लोकांसाठी आवळा हा घातक ठरतो. कारण आवळाचं सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी घसरते.


आवळा जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट खराब होण्याची भीती असते. डारिया आणि डिहायड्रेशन समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी चुकूनही आवळा खाऊ नये.


आवळा हा थंड असतो त्यामुळे सर्दी आणि तापात आवळाचं सेवन करु नये.


ज्या लोकांची टाळू किंवा त्वचा कोरडी असते त्यांनी आवळा खाऊ नका. या लोकांनी आवळा खाल्ल्यास केस गळणं , खाज येणे, कोंडा होणे आणि केसांशी संबंधित इतर समस्या त्यांना होऊ शकतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story