पायाच्या ढोपऱ्यांची त्वचा ही शरीराच्या इतर अंगांचा तुलनेत गडद रंगाची असते, त्यामुळे त्याची साफसफाई करणं तितकंच गरजेचं आहे.
तेव्हा काळवंडलेल्या ढोपरां स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेऊयात.
सामग्री : उडीद डाळ, टोमॅटोचा ज्यूस, देशी तूप, चंदन पावडर
उडीद डाळ तीन तास पाण्यात भिजवा आणि मग मिक्सरमध्ये वाटून घ्या. मिश्रण भांड्यात काढून त्यात दोन टोमॅटो मिक्स करा.
मग यात चंदन पावडर आणि देशी तूप मिक्स करून पेस्ट तयार करा.
तयार झालेला हा घरगुती लेप आंघोळीच्या पूर्वी गुडघ्यांवर लावा आणि त्वचेवर स्क्रब करून स्वच्छ करा. तुम्हाला आठवड्याभरात चांगला बदल दिसेल.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचा त्वचेवर वापर करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)