झोपण्यापूर्वी नाभीला लावा 'हे' तेल, 6 आजार होतील दूर

Pooja Pawar
Apr 03,2025


आयुर्वेदानुसार नाभी ही आपल्या शरीराचा केंद्रबिंदू असते. नाभीचा संबंध हा शरीराच्या सर्व अंगांशी असतो. त्यामुळे नाभीत तेल टाकल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात.


झोपण्यापूर्वी नाभीला ऑलिव्ह ऑईल लावण्याचे फायदे जाणून घेऊयात.


झोपण्यापूर्वी नाभीला ऑलिव्ह ऑईल लावल्याने हृदयासंबंधित समस्या दूर राहतात. ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात.


नाभीत ऑलिव्ह ऑईल लावल्याने कोलेस्ट्रॉलची लेव्हल कंट्रोलमध्ये येऊ शकतो. तेव्हा दररोज रात्री दोन थेंब ऑलिव्ह ऑईल नाभीत लावा.


नाभीत तेल टाकल्यामुळे पोटाशी संबंधित आजार दूर होतात. नाभी ही आपल्या शरीराचा केंद्रबिंदू असते. त्यामुळे त्याला ऑलिव्ह ऑईल लावल्याने पोटदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.


ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई असते. हे तेल तुम्ही नाभीत लावले तर त्वचा देखील ग्लो होते आणि स्किन ड्रायनेस सुद्धा कमी होतो.


जर तुम्ही सांधेदुखीने त्रस्त असाल तर रात्री नाभीत तेल टाकून झोपा. दररोज असं केल्याने सांधेदुखीपासून आराम मिळेल.


बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपण नाभीमध्ये ऑलिव्ह ऑईल टाकू शकता. 2 थेंब ऑलिव्ह ऑइल टाकल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story