थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडू नये म्हणून अनेकजण त्वचेवर बॉडीलोशनचा वापर करतात.
पण त्वचेवर सारखं किंवा जास्त प्रमाणात बॉडी लोशन लावण्याने त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
प्रत्येक बॉडी लोशनमध्ये तेलकट घटक असतात जे चेहऱ्यावरील नाजूक छिद्रे बंद करू शकतात, ज्यामुळे त्वचेवर ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स आणि पिंपल्स सारख्या समस्या उद्भवू शकतात.
ज्या लोकांची त्वचा ही ऑयली असते अशा लोकांनी बॉडी लोशन वापरणं टाळायला हवं. अन्यथा तज्ज्ञांच्या सल्ल्याने बॉडी लोशन वापरायला हवं.
हिवाळ्यात त्वचा ही अतिशय संवेदनशील होते अशावेळी अतिरिक्त बॉडी लोशनमुळे एलर्जी होऊ शकते. तसेच यामुळे पिंपल्स सुद्धा येऊ शकतात.
चेहऱ्यावर बॉडी लोशन वापरल्याने त्वचेचा ओलावा संतुलन बिघडू शकतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)