अन्न शिजवताना त्याची चव का घेऊ नये? शास्त्रात सांगितलं की ही चूक...

Mar 09,2025

नियम

हिंदू धर्मात स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासंबंधी बरेच नियम सांगितले गेले आहेत आणि हे नियम जवळपास सर्वचजण पाळतात. 'जेवण बनवताना ते मध्येच चाखू नये', हा त्यातीलच एक नियम.

देवीचा वास

खरंतर, स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो. त्यामुळे घरात जेवण बनवल्यानंतर सर्वप्रथम घास हा देवीला अर्पण करावा, असे मानले जाते.

उष्ट जेवण

जेवण बनवताना ते चाखल्यानंतर जेवण उष्ट होण्याची शक्यता असते आणि अशा जेवणाचा नैवेद्य आपण देवाला अर्पण करु शकत नाही.

हवा तसा परिणाम

तसेच, उष्ट्या जेवणाचं सेवन केल्याने हवा तसा परिणाम मिळवण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जेवण मध्येच चाखणं टाळलं पाहिजे.

आर्थिक समस्या

त्याचबरोबर जेवण उष्टं केल्याने आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, असं म्हणतात.

बॅक्टेरिया आणि व्हायरस

वैज्ञानिकदृष्ट्या, जेवण बनवताना ते उष्ट केल्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता वाढू लागते.

चूक

याच कारणांमुळे, जेवण बनवताना ते मध्येच चाखून उष्ट करण्याची चूक कधीच करु नका.


(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

VIEW ALL

Read Next Story