उन्हाळ्यात कारचा AC किती नंबरवर चालवावा?

Pooja Pawar
Apr 10,2025


उष्णतेच्या झळा आता लागू लागल्या आहेत. त्यामुळे घर, ऑफिस, कार इत्यादी सर्वच ठिकाणी असलेल्या एसीचा वापर वाढलाय.


कारमध्ये प्रवास करताना गरम होऊ नये म्हणून जवळपास प्रत्येक कार मध्येच आता एसी लावलेला असतो. तेव्हा गाडीतला एसी किती क्रमांकावर चालवावा ज्याने चांगलं मायलेज सुद्धा मिळेल याविषयी जाणून घेऊयात.


गाडीतला एसी हा नंबर 1 किंवा 2 वर (मध्यम फॅन स्पीड) चालवावा, असं केल्यास गाडी सर्वोत्तम मायलेज देते. कारचा एसी यावेगाने चावला तर केबिन चांगले थंड होते.


जास्त पंख्याच्या वेगाने (3-4) ब्लोअर जास्त पॉवर वापरला जातो. परिणामी इंजिनवरील भार वाढतो आणि मायलेज कमी होऊ लागते. त्यापेक्षा तुमच्या कारमधील तापमान 24°C ते 26°C दरम्यान ठेवणे उत्तम असते.


उन्हाळ्यात तुम्ही जर कार सावली खाली पार्क केली नसेल तर कार सुरु करताना 1 ते 2 मिनिटं कारच्या खिडक्या उघड्या ठेवा. जेणेकरून गरम हवा बाहेर पडेल.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story