गव्हाच्या पीठाचे हे लाडू पौष्टिक तर असतातच पण पोटभरीसाठीदेखील उत्तम पर्याय आहे.
जाणून घेऊया गव्हाच्या पीठाच्या लाडवांची रेसिपी
गव्हाचे पीठ 3 कप, तूप 2 कप, गुळ 300 ग्रॅम,खारीक 10/12, खोबर 2 कप,डिंक 10 ग्रॅम, मखाणे 1 कप, काजू 10 ते12, बदाम 10 ते12, अक्रोड 10 ते 12, जायफळ पावडर 1 चमचा, वेलची पावडर 1 चमचा
सगळ्यात आधी एक वाटी तूप गरम करुन त्यातूपात गव्हाचे पीठ चांगले भाजून घ्या. पीठाचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करुन टाका.
आता कढाईत तूप टाकून डिंक टाकून भाजून घ्या. त्यापाठोपाठ बदाम, काजू सह ड्रायफ्रुट्स भाजून घ्या. किसलेले खोबरेदेखील भाजून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात हे सगळे पदार्थ बारीक करुन घ्या. नंतर एका भांड्यात गुळ वितळवून घ्या.
एका भांड्यात पीठ आणि सर्व मिक्सरमध्ये बारीक केलेल पदार्थ एकत्र करुन घ्या. आता त्यात वितळलेला तुपदेखील टाका.
आता या मिश्रणाचे छोट्या आकाराचे लाडू तयार करुन घ्या.