फणस खाल्ल्यावर चुकूनही करू नका 'या' पदार्थांचं सेवन

Published by: Pooja Pawar | May 17, 2025

मे - जून महिन्यात बाजारात फणस यायला सुरुवात होते. फणसाचे गोडं रसाळ गरे जेवढे आवडीने खाल्ले जातात तेवढीच भाजी सुद्धा आवडीने खाल्ली जाते.

Published by: Pooja Pawar | May 17, 2025

मात्र फणस खाल्ल्यावर काही ठराविक पदार्थ खाणं टाळायला हवं, अन्यथा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

Published by: Pooja Pawar | May 17, 2025

फणस खाल्ल्यावर त्यानंतर लगेचच भेंडीचे सेवन करू नये. कारंण यामुळे त्वचेवरील रॅशेस, पुरळ किंवा खाज अशा तक्रारी वाढू शकतात.

Published by: Pooja Pawar | May 17, 2025

फणस खाल्यानंतर पानाचे सेवन करणं टाळावं. यामुळे पचनक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. फणसामधील ऑक्सलेट्स आणि पान या दोन्हीच्या क्रियेमुळे पचनक्रिया मंदावू शकते. फणस खाल्यानंतर पान खायचे असेल तर किमान 2 ते 3 तासानंतर तुम्ही ते खाऊ शकता.

Published by: Pooja Pawar | May 17, 2025

फणस खाल्ल्यावर लगेचच पपई खाणं टाळावं. कारण पपईत कॅल्शियम तर फणसात असलेले ऑक्सलेट हे घटक एकत्र रिएक्ट करतात आणि कॅल्शियम ऑक्सलेट तयार होते. यामुळे शरीरातील कॅल्शियमवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच हाडांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

Published by: Pooja Pawar | May 17, 2025

फणस खाल्ल्यावर त्यावर दूध पिणं टाळायला हवं. अशाने पचनक्रिया बिघडून गॅस, ॲसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. फणस खाल्यानंतर किमान 2 ते 3 तासानंतर तुम्ही दूध पिऊ शकता.

Published by: Pooja Pawar | May 17, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | May 17, 2025

VIEW ALL

Read Next Story