दह्याचं सेवन करणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं, पण काही पदार्थ दही सोबत अजिबात खाऊ नयेत. कारण यामुळे आरोग्याला अपाय होऊ शकतो.
दही सोबत कांदा अजिबात खाऊ नये, कारण यामुळे पोट बिघडू शकतं.
दही सोबत माश्याचे सेवन करू नये, यामुळे त्वचा रोग, पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
दही आणि उडदाच्या डाळीचे कॉम्बिनेशन चांगलं नाही. यामुळे ऍसिडिटी, डायरिया, सूज येणे सारख्या समस्या उद्भवू शकतात.
दही सोबत आंबट फळांचे सेवन करणं टाळावं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)