घराला चुकूनही करू नका 'हा' रंग, आयुष्य होईल बेरगं; इतके प्रॉब्लेम येतील की...

Pooja Pawar
May 19,2025


वास्तूशास्त्रामध्ये घराविषयी अनेक नियम सांगितले जातात. जर या नियमांचं पालन झालं नाही तर अनेक समस्या येऊ शकतात.


वास्तूशास्त्रामध्ये घराच्या भिंतींना कोणता रंग लावू नये याविषयी सुद्धा सांगण्यात आलं आहे.


सनातन धर्माच्या मान्यतेनुसार घराला काळा रंग लावू नये.


असं केल्याने अनेक अडथळे आणि त्रास होऊ शकतो.


काळ्या रंगाचा संबंध हा राहू आणि शनि ग्रहाशी असून घरात राहू असणं गरिबी आणि आजारांचं लक्षण आहे. अशाने मुलांची मानसिक स्थितीसुद्धा खराब होऊ शकते आणि त्यांना आरोग्याशी निगडित समस्या सुद्धा येऊ शकतात.


घराला काळा रंग केल्यानं घरात आर्थिक चणचण वाढू शकते. तसेच आरोग्यावर सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतो.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तूशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story