चांगली झोप येण्यासाठी कोणतं दूध प्यावं?

Pooja Pawar
Feb 01,2026


चांगली झोप ही शरीर आणि मेंदू या दोघांसाठी आवश्यक असते. यामुळे थकवा आणि ताण कमी होतो तर स्मरणशक्ती चांगली राहते. तसेच पुढच्या दिवशी काम करण्यावर फोकस राहतो.


तेव्हा चांगली झोप येण्यासाठी कोणतं दूध प्यावं याबद्दल जाणून घेऊयात.


बदामाचं दूध हे चांगल्या झोपेसाठी उत्तम मानलं जातं. यात मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅन असतं, जे डोकं शांत ठेवतं आणि झोप येण्यासाठी लागणारा वेळ कमी करते.


बदामाचे दूध नर्वस सिस्टमला आराम देतात. रात्री बदामाचं दूध प्यायल्याने चिंता आणि अस्वस्थता कमी होते. ज्यामुळे झोप लवकर येते.


मॅग्नेशियमने समृद्ध असलेले बदामाचे दूध स्नायूंचा कडकपणा कमी करते आणि शरीराला आराम देते, ज्यामुळे गाढ आणि शांत झोप लागण्यास मदत होते.


बदामाचं दूध हे पचण्यासाठी हलकं आणि सोपं असतं. यामुळे पोटात गॅस आणि जडपणा होतं नाही.


बदामाचे दूध प्यायल्याने झोपेचे चक्र सुधारते आणि तुम्हाला दररोज एका वेळी झोपायला मदत करते.


बदामाच्या दुधात असलेले हेल्दी फॅट आणि मॅग्नेशियम हृदय आणि आरोग्य उत्तम राखते. हृदय स्वस्थ ठेवते आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य राहिल्याने झोप ही जास्त शांत आणि गाढ येते.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story