बाजरीमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, चरबी, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे अनेक पौष्टिक घटक असतात.
भारतात घराघरात बाजरीपासून भाकरी तसेच अनेक पौष्टिक पदार्थ बनवले जातात.
पण तुम्ही कधी बाजरीपासून बनलेली इडली खाल्ली आहे का? चला तर मग सोपी रेसिपी पाहूया.
बाजरीची इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम बाजरी आणि उडदाची डाळ 4 तास पाण्यात भिजत ठेवा.
नंतर बाजरी आणि डाळ दोन्ही मिक्सरच्या सहाय्याने बारीक वाटून घ्या.
हे पीठ एका भांड्यात काढा आणि एकत्र मिसळून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घाला.
नंतर हे पीठ 6 ते 8 तास आंबवण्यासाठी एका ऊबदार जागी ठेवा.
आता इडली मोल्डला थोडं तेल लावा. त्यात पीठ ओतून स्टीमरमध्ये ठेवा.
इडली अंदाजे 12–15 मिनिटे वाफेवर शिजवा.
गरमा गरम आणि मऊसूत बाजरीची इडली चटणीसह सर्व्ह करा.