बकरा कधी दिखावा नाही करत. तो सहजतेने आयुष्य जगतो. आयुष्यात विनम्रता अबलंबा.
सर्व सहन करणे, कधी तक्रार न करणे यातून आयुष्यात धैर्य किती गरजेचे आहे, हे बकरा शिकवतो.
बकरा नेहमी झुंडीत असतो. ज्यामुळे एकत्र राहणे, एकता आणि सामुहीक ताकद महत्वाची असते हे कळते.
कोणत्याही वातावरणता तो समरस होऊन जातो. आयुष्यात हा गुण खूप महत्वाचा आहे.
असलेल्या संसाधनात बकरा खूष असतो. यातून आयुष्यात संतोष किती महत्वाचा आहे, हे कळते.
एका झाडाच्या पानापर्यंत पोहोचण्यासाठी बकरा खूप मेहनत घेतो. परिश्रम कधी व्यर्थ जात नाहीत, हे यातून कळते.
बकरा हा आक्रमक नाहीय.पण गरज पडल्यास आत्मरक्षा करतो. कोमलता ही कमजोरी नाही, हे यातून लक्षात येते.
बकरा आपल्या मालकाला ओळखतो. आपल्याला मदत करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे.
बकरी ईद सारख्या सणामध्ये बकरा हे त्यागाचे प्रतिक असतो. आयुष्यात मोठेपणा समर्पणातून मिळतो, हे यातून शिकता येते.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)