फक्त भारतातच नाही 'या' देशात सुद्धा आहे ताजमहाल

Pooja Pawar
Mar 30,2025


जगातील सात आश्चर्यांमध्ये ताजमहालचं नाव येतं. आग्रा येथे असलेलं ताजमहाल प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं ज्याला पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात.


पण तुम्हाला माहितीये का? ताजमहाल केवळ आग्रामध्येच नाही तर अजून एका देशामध्ये सुद्धा आहे.


आग्राच्या ताजमहाल सारखी दिसणारी ही वास्तू भारताच्या शेजारी असलेल्या बांगलादेशमध्ये आहे.


बांगलादेशमध्ये असणारा हा ताजमहाल 10 वर्षांपूर्वीच म्हणजे 2008 मध्ये बनवून तयार झाला होता.


बांगलादेशमधील श्रीमंत चित्रपट निर्माते अहासानुल्लाह मोनी यांनी ही वास्तू बांधण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी 56 मिनियन डॉलर खर्च करण्यात आले.


अहासानुल्लाह मोनी यांनी ताजमहाल सारखी दिसणारी वास्तू यासाठी बनवली जेणेकरून त्यांच्या देशात राहणारे जे लोकं ताजमहाल पाहण्यासाठी भारतात जाऊ शकत नाहीत. ते बांगलादेशमध्येच ताजमहाल पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.


त्यामुळेच याला काही जण गरिबांचा ताजमहाल असे देखील म्हणतात.


बांगलादेशमध्ये बांधलेल्या या वास्तूची डिझाईन आग्र्यातील ताजमहालशी मिळती जुळती आहे. याच्या बांधकामासाठी इटलीमधून संगमरमर आणि ग्रेनाईट मागवले गेले होते.

VIEW ALL

Read Next Story