शुक्रवारी 21 जूनला वट पौर्णिमेचा सण साजरा करण्यात येणार आहे.
यादिवशी सुवासिनी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात.
साजश्रृंगार करुन महिला साडी, दागिनी आणि बांगड्या घालून वडाची पूजा करण्यासाठी जातात.
यादिवशी निळी, काळी आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसू नयेत. त्यासोबत चुकूनही दोन रंगाच्या बांगड्या घालू नयेत.
शास्त्रानुसार महिलांनी पूजा करताना दोन तरी काचेच्या बांगड्या घातल्याच पाहिजे. काचेच्या बांगड्यांचा संबंध हा शुक्र आणि चंद्राशी आहे. शक्य असल्यास सहा - सात बांगड्या नक्की घाला.
हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घाला. काळया आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)