वाचून आश्चर्य वाटेल पण जास्त पाणी घातल्यानेही तुळस सुकू शकते. तसेच खत कमी जास्त घालणे, सूर्यप्रकाश कमी अधिक मिळणे आणि किड लागल्यामुळे सुकू शकते.
तुळशीचे रोप पुन्हा टवटवीत करण्यासाठी तुम्ही शेण आणि कडुलिंबाची पाने वापरू शकता.
तुळशीला योग्य प्रमाणात पाणी घालणे अत्यंत गरजेचे असते. माती खूप ओली होईपर्यंत पाणी देऊ नका.
सूर्यप्रकाशात तुळशीची वाढ लवकर होते. चांगल्या वाढीसाठी 6 ते 8 तास सूर्यप्रकाश लागतो. तुळस मोकळ्या जागेत लावावी.
आठवड्यातून एकदा तुळशीच्या रोपाची छाटणी करा.