गव्हाच्या पीठाची बटाटा मसाला पुरी, मुलंही आवडीने खातील!

Published by: Mansi kshirsagar | Aug 20, 2024

मुलं कधीकधी खायला कंटाळा करतात अशावेळी त्यांना हटके असा बटाटा मसाला पुरी तुम्ही करुन देऊ शकाल

Published by: Mansi kshirsagar | Aug 20, 2024

साहित्य

गव्हाचे पीठ, रवा, बेसन,उकडलेले बटाटे,कसुरी मेथी,मिरची, कोथिंबीर, ओवा, चाट मसाला, तिखट, मीठ, गरम मसाला, तळण्यासाठी तेल

Published by: Mansi kshirsagar | Aug 20, 2024

कृती

गव्हाच्या पीठात रवा, बेसन आणि उकडलेले बटाटे किसून घाला. त्यानंतर यात बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर घाला.

Published by: Mansi kshirsagar | Aug 20, 2024

आता या मिश्रणात ओवा, कसुरी मेथी, चाट मसाला, तिखट, थोडा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करुन घ्या. आता त्यात थोडं थोडं पाणी घालून चांगले मळून घ्या.

Published by: Mansi kshirsagar | Aug 20, 2024

आता या पीठाच्या पुऱ्या लाटून घ्या. एकीकडे तेल तापवून घ्या.

Published by: Mansi kshirsagar | Aug 20, 2024

कडकडीत तेलात पुऱ्या चांगल्या तळून घ्या. मुलांना पण हा खाऊ नक्की आवडेल

Published by: Mansi kshirsagar | Aug 20, 2024

VIEW ALL

Read Next Story