उन्हाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे योग्य की अयोग्य ?

Apr 03,2024


उन्हाळा सुरू झाला की आंघोळ अतिशय महत्त्वाची ठरते. ऋतू कोणताही असो स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करणे खूप गरजेचे आहे.


परंतु हिवाळ्यानंतर उन्हाळ्यातही अनेक जण गरम पाण्याने आंघोळ करतात. गरम पाण्याने अंघोळ केल्याने अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.


त्यामुळे कायम थंड पाण्याने आंघोळ करणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.


तज्ज्ञांच्या मते 70 अंश फॅरेनहाइट किंवा 21 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असलेले पाणी थंड मानले जाते. अशा थंड पाण्याने तुम्ही शॉवर घेऊ शकता.


आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी चयापचय चांगले असणे आवश्यक आहे. थंड पाण्याच्या संपर्कात आल्याने चयापचय दर अनेक पटींनी वाढू शकतो.


तुमचे पाणी जास्त थंड नसावे आणि तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ अंघोळ करू नये. तुम्ही आजारी असाल तर आंघोळ टाळा.

VIEW ALL

Read Next Story