सावधान! अशा लोकांनी लसूण अजिबात खाऊ नये; बिघडू शकते तब्बेत

Swapnil Ghangale
Dec 04,2023

सर्वांसाठी सेवन फायद्याचं नाही

लसूण हा आरोग्यासाठी फायद्याचा असतो. मात्र त्याचं सेवन सरसकट सर्वांसाठी फायद्याचं नाही.

कोणी करु नये अधिक सेवन?

कोणी लसणाचं अधिक प्रमाणात सेवन करु नये हे आज आपण जाणून घेणार आहोत.

रक्तदाबाची समस्या असेल तर...

लसणाचं सेवन केल्याने रक्तदाब वाढतो. ज्यांना अस्वस्थता, चक्कर येणे किंवा रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी लसणाचे सेवन कमी करावे.

रक्ताची कमतरता असेल तर...

शरीरात रक्ताची कमतरता असताना लसूण न खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

यकृतासंदर्भातील समस्या

लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे यकृतासंदर्भातील समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते.

प्रमाणात सेवन

त्यामुळेच जास्त लसूण खाल्ल्याने यकृत खराब होऊ शकते. त्यामुळे लसणाचं योग्य प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरते.

...त्यांनी लसूण अजिबात खाऊ नये

ज्यांना उलट्या आणि अतिसाराचा त्रास होतो त्यांनी लसूण अजिबात खाऊ नये.

अस्वस्थता निर्माण होऊ शकते

लसणामधील उष्णतेमुळे पोटात जळजळ होऊ शकते. यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

लसणाचे कमी प्रमाणात सेवन करावे

वारंवार गॅस-ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ होण्याची तक्रार असलेल्यांनी लसणाचे कमी प्रमाणात सेवन करावे.

अधिक वाढू शकतो

छातीत जळजळ असताना लसणाचे सेवन केल्याने त्रास अधिक वाढू शकतो. अन्नपचनासंदर्भातील समस्या निर्माण होऊ शकतात.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. आरोग्यविषयक सल्ला आपल्या फॅमेली डॉक्टरांकडून घ्यावा.

VIEW ALL

Read Next Story