केस पातळं झालेत, सारखे गळताहेत? घरीच बनवा Red Hair Oil

Mansi kshirsagar
May 24,2025


केस जर सतत गळत असतील किंवा पातळ झाले असतील तर आत्ताच हा घरगुती उपाय करुन पाहा


केस गळती रोखण्यासाठी तुम्ही घरच्या घरी हे आयुर्वेदिक लाल तेल बनवू शकता


हे तेल बनवण्यासाठी एक बीट रूट, एक कपमेथीचे दाणे आणि आल्याचे काही तुकडे उन्हात वाळवून घ्या


सगळे पदार्थ उन्हात कडकडीत वाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये त्याची छान पावडर करुन घ्या.


त्या नंतर या पेस्टमधून तीन टेबलस्पून पावडर एका कापडात बांधून व्यवस्थित बांधून घ्या.


त्यानंतर एका काचेच्या भांड्यात नारळाचे तेल घ्या व कापडात बांधलेली पावडर त्यात टाकून ठेवा.


एक भांडे त्यात पाणी घेऊन गॅसवर ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यात तेल असलेले काचेचे भांडे ठेवा


आता काचेच्या बरणीतच असलेल्या कापडाने केसांच्या मुळांना हे तेल लावून घ्या. संपूर्ण केसांना व्यवस्थित या तेलाने मसाज करुन घ्या


केसांना तेल लावून झाल्यावर दोन ते तीन तास तसंच ठेवा. केसांना तेल लावून झाल्यावर दोन ते तीन तासांनी शॅम्पुने धुवून टाका.

VIEW ALL

Read Next Story