मैत्रिणींनो लिपस्टीक खरेदी करताना वापरा 'या' स्मार्ट टीप्स, फायदा तुमचाच
लिपस्टीक खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही, तर त्याचे दुष्परिणामही होतात. महत्त्वाचं म्हणजे स्वस्तातली लिपस्टीक पाहून ती खरेदी करण्याची घाई करु नका.
ओठांचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी नैसर्गिक साहित्याचा वापर केलेली लिपस्टीक तुम्ही वापरू शकता. पण, त्याआधी ती खरेदी करायच्या वेळी एक्सपायरी डेट नक्की चेक करा.
लिपस्टीक खरेदी करण्याआधी त्यामध्ये वापरलं गेलेलं साहित्यही आवर्जून पाहा. यामध्ये तुम्हाला अॅलर्जी असणारा कोणताही घटक नाही, हेसुद्धा ओळखा.
लिपस्टीक लावण्यापूर्वी ओठांना पेट्रोलियम जेली लावून ते व्यवस्थित पुसून घ्या. लिपस्टीकच्या आधी एक थर लिप बाम किंवा या जेली लावा.
गरोदरपणात लिपस्टीक लावणं टाळा. किंबहुना दर दिवशीसुद्धा लिपस्टीक लावू नका. यामुळं ओठांना नुकसान पोहोचू शकतं.
लिपस्टीक खरेदी करत असताना ती काढण्याची पद्धतही पाहून घ्या. सोप्या पद्धतीनं ती निघणारी असावी याची काळजी घ्या.
लिपस्टीक लाँग लास्टींग असली तरी ती काढताना मात्र सहजपणे निघेल हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं.