भारतीय स्वयंपाकघरात हिंगचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
डॉक्टर किंवा तज्ज्ञ नेहमीच आहारात हिंगचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
आयुर्वेदातदेखील हिंगेला विशेष महत्त्व आहे. पोटासंबंधी समस्या दूर करण्यासाठी हिंग फायदेशीर ठरते.
जड पदार्थ खाल्ल्याने पोटात कळ येते आणि वेदना होतात, त्यासाठी हिंगाचे पाणी रामबाण उपाय ठरते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर हिंगाचे पाणी प्यायला हवे.
महिलांना मासिक पाळी दरम्यान पोटात कळ येते आणि वेदना होतात.
अशा वेळी हिंग घातलेले पाणी प्यायल्याने वेदना कमी करण्यास मदत मिळते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)