सकाळी अनेकांना चहा, कॉफी, ग्रीन टी इत्यादी घेण्याची सवय असते. पण तुम्हाला माहितीये का? रिकाम्यापोटी सफरचंद खाल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.
सकाळी सफरचंद खाल्ल्याने पचनसंस्था चांगली राहते. तसेच रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने एनर्जी येते आणि हलकं वाटतं.
जे लोकं वर्कआउट करतात आणि वजन नियंत्रणात राहण्यासाठी प्रयत्न करतात अशांसाठी रिकाम्या पोटी सफरचंद खाणं चांगली सवय आहे.
सफरचंदमध्ये नैसर्गिकपणे साखर आणि फायबर असतं ज्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळते. महिनाभर ही सवय लावल्यानंतर, तुम्हाला अधिक सक्रिय आणि तंदुरुस्त वाटू लागेल.
सफरचंदमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला नैसर्गिक चमक देतात आणि केसांना चमकदार बनवतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)