पावसाळ्यात भाजलेला मका खाण्याचे 5 फायदे महितोयेत का?

Published by: Pooja Pawar | Jul 26, 2025

पावसाळ्यात भाजेलला मका खाण्याची मजा काही औरच असते. पण हा मका चवीपुरताच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर असतो.

Published by: Pooja Pawar | Jul 26, 2025

भाजलेल्या मक्याच्या मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतं. कार्बोहायट्रेट हे ऊर्जेचं प्रमुख स्रोत असतं आणि ज्यामुळे शरीराला भरपूर उर्जा मिळते.

Published by: Pooja Pawar | Jul 26, 2025

मका हा मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस इत्यादी खनिजांनी परीपूर्ण असतो आणि यामुळे संधीवातासारख्या समस्या टाळता येतात.

Published by: Pooja Pawar | Jul 26, 2025

भाजलेल्या मक्यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि फ्लेवोनॉईड्स भरपूर प्रमाणात असतं. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

Published by: Pooja Pawar | Jul 26, 2025

मक्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास आणि डोळ्यांसंबंधित समस्या रोखण्यास मदत मिळते.

Published by: Pooja Pawar | Jul 26, 2025

गरोदर महिलांसाठी सुद्धा भाजलेला मका हा पौष्टिक ठरतो. कारण यामध्ये व्हिटॅमिन बी 9 आढळते जे गर्भधारणेदरम्यान महिलांसाठी महत्त्वाचं असतं.

Published by: Pooja Pawar | Jul 26, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Jul 26, 2025

VIEW ALL

Read Next Story