खजूरमध्ये कार्बोहायड्रेट, पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम, आयरन आणि भरपूर व्हिटॅमिन्स असतात.
खजूरमध्ये फायबर आणि आयरन असतं ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहतं.
तज्ज्ञांच्या मते दररोज रिकाम्यापोटी 3 खजूर खाल्ल्याने संपूर्ण दिवस शरीरात एनर्जी राहते आणि पोट भरल्यासारखं वाटतं.
खजूरमध्ये नैसर्गिक साखर आढळते ज्याच्या सेवनाने डायबेटिज रुग्णांची गोड खाण्याची क्रेविंग कमी होते.
खजूरमध्ये असलेले भरपूर आयरन हे एनीमियाच्या आजारांसाठी फायदेशीर ठरते. तसेच हिमोग्लोबिन सुद्धा वाढण्यास मदत होते.
खजूर दररोज रिकाम्यापोटी खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. बद्धकोष्टता, गॅस सारख्या समस्या कमी होतात.
खजूर तुम्ही सकाळी असेच सुद्धा खाऊ शकता किंवा मग रात्रभर पाण्यात भिजवून सुद्धा खाऊ शकता.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)