भारतात दैनंदिन आहारामध्ये कायमच चपातीचा समावेश केला जातो.
दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण किंवा मग न्याहारी असो. चपातीला यात स्थान मिळतंच.
सहसा जास्त प्रमाणात पोळ्या किंवा चपात्या बनवल्यानं त्या शिल्लक राहतात आणि काही मंडळी त्या फेकूनही देतात, तर काहीजण त्या दुसऱ्या दिवशी खातात.
असं म्हणतात की या शिळ्या पोळ्यांबद्दल आयुर्वेदातही लिहिलं आहे. ज्यानुसार त्यांच्यात काही उपयोगी घटक असतात.
पचनक्रीया, रक्तातील साखर इथपासून वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्यांसाठी शिळी चपाती एक चांगला पर्याय असते.
शिळ्या चपातीत कमी कॅलरी आणि अधिक फायबर असतात. ज्यामुळं तिच्या सेवनानं पोट भरलेलं राहतं.
थोडक्यात शिळी चपाती खाणं ही वाईट सवय नाही. मात्र शरीराला कोणत्या गोष्टी योग्य याचा सल्ला तज्ज्ञांकडूनही घेणं उत्तम. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)