भारतामध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांसाठी तेलाचा त्यातरी रिफाईंड तेलाचा वापर होतो. पण, या तेलाचा अतिवापर स्थुलता, हृदयरोग या आणि तत्सम समस्या बळावण्याचं कारण ठरतं.
तज्ज्ञांच्या मते प्रोसेस्ड आणि पाकिटबंद खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात रिफाईंड ऑईल असतं. ज्यामुळं हृदयरोगाचा धोका बळावतो. ज्यामुलं एका महिन्यासाठी त्याचा वापर टाळणं फायद्याचं ठरेल.
महिन्याभरासाठी जेवणातून रिफाईंड तेलाचा वापर टाळल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. त्वचा नितळ होते, हृदयाचं आरोग्य उत्तम राहलं आणि वजनही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यातही ही सवय मदत करते. शिवाय रिफाईंड तेलाच्या वापरामुळं पचनक्रियाही सुधारते.
जेवणात तेलाचा वापर केला नाही तरी अन्नपदार्थांमध्ये असणाऱ्या इतर घटकांमधून तुमच्या शरीराला स्निग्ध पदार्थांचा पुरवठा होऊ शकतो. यामध्ये घरच्या घरी तयार करण्यात आलेलं तूप, लोणी, दाण्याचा, सुक्या खोबऱ्याचा कूट या साऱ्याचा समावेश आहे.
आरोग्याच्या दृष्टीनं चांगल्या सवयी कायमच फायद्याच्या. पण, त्यातही तुम्ही आहारामध्ये एखादा बदल करू पाहत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.